रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शिंदे शिवसेनेचे नेते जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांचे मोठे चिरंजीव अमित जयसिंग घोसाळे (वय ४५) यांचे काल रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास दापोली येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या घटनेने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
अमित घोसाळे हे आंब्याच्या व्यवसायात कार्यरत होते. ते कालच दापोली येथील आपल्या सासरवाडीला गेले होते. रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, ज्यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने घोसाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अमित घोसाळे यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने जिल्हाभरातून शोक व्यक्त केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 08-07-2025














