चिपळूण : चिपळूण तालुक्यातील नारदखेरकी, भंडारवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ जुलै २०२५ रोजी दुपारी ४:०७ वाजता प्रसाद अनंत हळदणकर यांच्या घराशेजारील सागवानाच्या झाडाखाली उघड्यावर घडली.
याबाबत चिपळूण पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई अर्जुन शिवाजी देशमुख (पोशि/१३२९) यांनी ७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७:०७ वाजता तक्रार दाखल केली. त्यानुसार, शशिकांत जयवंत जाधव (वय ४५, व्यवसाय शेती, रा. नारद खेरकी, वेताळवाडी, ता. चिपळूण) या आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शशिकांत जाधव याने विनापरवाना ९५०/- रुपये किमतीची ९ लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगलेली असताना आढळून आला. पोलिसांनी ही दारू कॅनसह जप्त केली आहे. चिपळूण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 08-07-2025














