रत्नागिरीत आठवडा बाजारात मटका जुगार अड्ड्यावर छापा

रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ७ जुलै २०२५ रोजी दुपारी १२:५० वाजता चिकन सेंटर शेडशेजारील बंद आराध्या जनरल स्टोअरच्या बाहेरच्या आडोशाला करण्यात आली.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल अरुण भोसले (पो.हे.कॉ/१३९९) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, महेंद्र भालचंद्र मायनाक (वय ६४, रा. मायनाकवाडी, मांडवी, ता. जि. रत्नागिरी) या आरोपीला महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र मायनाक हा आठवडा बाजार झोपडपट्टी येथील चिकन दरबार चिकन सेंटर शेडच्या शेजारील बंद आराध्या जनरल स्टोअरच्या बाहेरील आडोशाला मटका जुगार खेळ खेळवताना रंगेहाथ पकडला गेला. पोलिसांनी त्याच्याकडून रोख २३० रुपये आणि मटका जुगाराचे साहित्य असा एकूण २३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 08-07-2025