खेड : खेड रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत असलेल्या एका युवकाचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदय दीपक कुमार (१८, रा. फत्तेगड साहिब, उत्तरप्रदेश हा २१ जून २०२५ रोजी रात्री १० वाजता हजरत निजामुद्दीन येथून मडगाव जंक्शनकडे एर्नाकुलम एक्सप्रेस (ट्रेन क्र. २२६५६) ने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान, दिनांक २२ जूनच्या पहाटे ६ वाजेच्या सुमारास, खेड रेल्वे स्थानकाजवळ त्यांच्या झोपेचा फायदा घेत अज्ञात इसमाने त्यांच्या जवळील रिअलमी कंपनीचा गडद निळ्या रंगाचा मोबाईल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सदर मोबाईलची किंमत अंदाजे सात हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना खेड रेल्वे स्थानकाच्या हद्दीत घडल्यामुळे खेड पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 08/Jul/2025














