रत्नागिरी जिल्हा पोलिसदलातील ५ अधिकारी सेवानिवृत्त

रत्नागिरी : जिल्हा पोलिसदलातील पाच वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाले असून, त्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत शुभेच्छा कार्यक्रम झाला.

जिल्हा पोलिसदलातील ३० जूनला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे पोलिस अधिकारी यांचा शुभेच्छा कार्यक्रम झाला. सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये लांजा उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत रघुनाथ केडगे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर लक्ष्मण कदम, पोलिस उपनिरीक्षक दीपक शांताराम पवार, पोलिस उपनिरीक्षक विजय नारायण कदम, मिलिंद राजाराम चव्हाण यांचा समावेश होता. पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधीक्षक राधिका फडके, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, पोलिस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन डेढे, निरीक्षक युवराज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 08/Jul/2025