गुहागर : तालुका पंचायत समितीतर्फे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी चारसूत्री भात लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. मुंढर येथील प्रगतशील शेतकरी विजय रामाणे यांच्या शेतात हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच परिसरात विविध झाडांची लागवड करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 08/Jul/2025














