युवकांनी सहकाराची चळवळ पुढे घेऊन जाणे आवश्यक : ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : सहकारातून अर्थकारण गतिमान होत असून सहकार हा रोजगार निर्मितीचा केंद्रबिंदू आहे. सहकार हा समृद्ध जीवनाचा पाया असून युवकांनी सहकारी चळवळीला पुढे घेऊन जाण्याचे आवाहन स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीमान वि. स. गांगण कला,वणिज्य आणि कै. त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने सहकार चळवळ अधिक वृद्धिंगत व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांना सहकारातून निर्माण होणाऱ्या रोजगार संधीं या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यानाचे आयोजन केले होते. हा उपक्रम राबवणाऱ्या या संस्थेमार्फत विविध कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे.पुस्तकी ज्ञानाची वास्तव जीवनाशी सांगड घालत सहकारी संस्थांची स्थापना, भांडवल निर्मिती, आर्थिक व्यवहार, कामकाज व सहकार क्षेत्रातील नोकरीच्या संधी याविषयी ॲड. पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.यावेळी पतसंस्थेचे रिलेशनशिप मॅनेजर स्वरूप प्रभुदेसाई , संचालक प्रसाद जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक राजन कीर यांनी केले. उदय गाडगीळ यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:26 08-07-2025