चिपळूण : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कुशिवडे ग्रामपंचायताच्या सहयोगातून कुशिवडे येथे जिल्ह्यात प्रथमच ग्रामसंघाची इमारत उभारण्यात आली आहे. समता महिला ग्रामसंघाच्या या कार्यालयात बचत गटाच्या उत्पादनांची विक्री, गोदाम, विविध उपक्रम, महिलांच्या बैठका घेण्यासाठी या इमारतीचा उपयोग केला जाणार आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे तर्फे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत कुशिवडे येथे महिला बचतगट भवनचे उद्घाटन माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी झाले. कुशिवडे महिलांचे २० गट असून त्यामध्ये २२० महिलांचा समावेश आहे. या महिलांच्या नियमित बैठका, दर महिन्याला होणारे विविध कार्यक्रम आणि उपक्रमासाठी या भवनचा वापर केला जाणार आहे. माजी सरपंच सिद्धार्थ कदम यांनी बचत गटात महिलांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. येथील महिला कष्टकरी असल्यानेच ग्रामसंघाची जिल्ह्यातील पहिली इमारत गावात उभी राहिली माजी आमदार चव्हाण यांनी सातत्याने गावच्या विकासात योगदा दिल्याचे सांगितले.
उमेदचे प्रभाग समन्वयक शुभम जाधव यांनी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, तालुकाप्रमुख संदेश आयरे, माजी महिला बालकल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, निहार कोवळे प्रवीण गायकवाड, सरपंच रोशन डिके, उपसरपंच गुणाजी डिके उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 16/Oct/2024











