रत्नागिरी, ७ जुलै २०२५: रत्नागिरी तालुका रोहिदास समाज सेवा संघ आणि स्थानिक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. पहिली ते पंधरावी पर्यंतच्या शैक्षणिक वर्षात चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी विशेष गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वह्या, पुस्तके, पेन आणि पेन्सिल वाटप करून त्यांचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याला रत्नागिरी तालुका रोहिदास समाज सेवा संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये तालुकाध्यक्ष विजय खेडेकर, सेक्रेटरी उदय कोतवडेकर, कार्याध्यक्ष परशुराम कदम, उपाध्यक्ष शरद गोळपकर, खजिनदार संतोष खेडेकर, उपाध्यक्ष सायली बसणकर आणि सहचिटणीस विजय चव्हाण आदींचा समावेश होता. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासाठी अधिक उत्साह निर्माण होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
19:48 08-07-2025














