खेड, (दि. ८ जुलै): शहरातील मीनाताई ठाकरे सभागृहाजवळ असलेल्या रिया ऑप्टिशियन दुकानाच्या बाजूला एक व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याने खेड शहरात खळबळ उडाली आहे. मुकुंद बाबूराव गुप्ते (वय ५६, रा. समर्थनगर, भरणानाका, खेड) असे मृताचे नाव आहे.
ही घटना मंगळवार, ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.४० वाजण्यापूर्वी उघडकीस आली. रिया ऑप्टिशियन दुकानाच्या बाजूच्या बंद गाळ्याच्या पायरीवर मुकुंद गुप्ते निपचित पडलेले दिसले. त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे ते मयत झाल्याची खात्री झाली.
या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ८ जुलै २०२५ रोजी दुपारी १.०९ वाजता भारतीय न्याय संहिता (BNSS) च्या कलम १९४ प्रमाणे, आमू. क्रमांक ७४/२०२५ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुकुंद गुप्ते यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 09-07-2025














