खेड, (दि. ८ जुलै): खेड तालुक्यातील तिसे बौध्दवाडी येथे प्रज्ञा सुचित पवार (वय २९) या तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ७ जुलै २०२५ रोजी दुपारी घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञा पवार यांनी रविवारी, ७ जुलै रोजी दुपारी ३.३० ते ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातील बेडरूममधील सीलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना त्यांच्या माहेरच्या घरी, तिसे बौध्दवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी येथे घडली.
या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ८ जुलै २०२५ रोजी पहाटे ००.४३ वाजता भारतीय न्याय संहिता (BNSS) च्या कलम १९४ नुसार ७३/२०२५ असा आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रज्ञा पवार यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 09-07-2025














