रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया मध्ये उद्यापासून ‘समझोता दिवस’

रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया रत्नागिरीतर्फे एनपीए कर्जदारांसाठी एकरकमी तडजोड योजनेंतर्गत १७ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत ‘समझोता दिवसा’चे आयोजन जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये करण्यात आले आहे. त्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्राहकांकडून आलेल्या सूचनेनुसार बँक ऑफ इंडिया, रत्नागिरीतर्फे सर्व शाखांमध्ये आणि विभागीय कार्यालयामध्ये पुन्हा समझोता दिवसाचे आयोजन केले आहे. निष्क्रिय (NPA) कर्ज खातेदारांसाठी एकरकमी तडजोड योजनेत त्यांची कर्ज भागवणे याद्वारे शक्य आहे. त्यासाठी १७ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत बँकेत संपर्क साधावयाचा आहे. हा समझोता दिवस विशेषतः एनपीए कर्जदारांसाठी आहे. जे कर्जदार व्यवसायातील, वैद्यकीय परिस्थितीमुळे किंवा इतर परिस्थितीजन्य कारणांमुळे कर्जाची परतफेड वेळेत करू शकले नाहीत आणि ती खाती एनपीए झालेली आहेत अशांसाठी बँक ऑफ इंडियाने ही संधी उपलब्ध करून दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 16-10-2024