फाटक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद

रत्नागिरी : येथील फाटक प्रशालेच्या आठवीतील ३२ विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत देवपाटवाडी नेवरे येथील सोन्या कोलगे यांच्या शेतात भातरोपांच्या लावणीचा आनंददायी अनुभव घेतला.

विद्यार्थ्यांना शेतीची अधिक माहिती मिळावी. शेतीकामाचा अनुभव घेता यावा. शेतीबद्दल आवड निर्माण व्हावी. ग्रामीण जीवनाची माहिती मिळावी, तसेच श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व आणि शेतकऱ्यांबद्दलचा आदर निर्माण व्हावा या उद्देशाने भातरोपांची लावणी या उपक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक राजन कीर आणि पर्यवेक्षिका नेहा शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

केळीच्या पानावरील न्याहारीचा आस्वाद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीतंत्राविषयी सविस्तर माहिती शेतकरी कोलगे दिली. उत्पादक उपक्रमांतर्गत भाताची रोपे म्हणजेच दाढ काढणे, चिखलात भाताची रोपे लावणे या कामांचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांसोबत प्रकाश देवरूखकर, संदीप आखाडे, नीलेश पावसकर आणि पूर्वा जाधव या शिक्षकांनी सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 09-07-2025