संगमेश्वर : माखजन-आरवली मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

संगमेश्वर : तालुक्यातील माखजन-आरवली या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. सध्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

माखजन-आरवली रस्त्यावर कोंडीवरे, बुरंबाड या गावात मोठमोठे खड्डे पडलेले असून, ते चिखलयुक्त पाण्यांनी भरून गेले आहेत. बाजूपट्टीही नामशेष झालेली आहे. काही ठिकाणी बाजूपट्टीची माती वाहून गेलेली आहे. दोन गाड्या समोरासमोर आल्या की, वाहने चालवणे अडचणीचे होते. या रस्त्यावरून माखजन पंचक्रोशीतील सुमारे २२ गावांतील रहिवासी सतत ये-जा करत असतात. या मार्गावरून सतत एसटी वाहतूक सुरू असते. रहदारीच्या आणि मुख्य अशा रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 09/Jul/2025