रत्नागिरी जिल्ह्याला ११ हजार टन खत उपलब्ध

रत्नागिरी : कृषी विभागाकडून जिल्ह्याला मंजूर असलेल्या खतांपैकी ११ हजार ७४१ टन खत उपलब्ध झाले आहे. आतापर्यंत १ हजार ५३७ पैकी ८१४ गावांमध्ये शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप केले गेले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. शिवकुमार सदाफुले यांनी दिली.

यंदा खरीप हंगामाकरिता एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी युरिया, डीएपी, संयुक्त खते, एसएसपीचे १२ हजार ९०८ टन खत मंजूर आहे. त्यापैकी ६ हजार ९८४ टन युरिया जिल्ह्याला मंजूर आहे. मागील तीन महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते जून या कालवधीत जिल्ह्यात ११ हजार ७४१ टन एवढे खत उपलब्ध झाले आहे. तसेच ७ हजार २३७ टन युरियाही उपलब्ध झाले.जिल्ह्यातील परिस्थिती पाहता मागील तीन वर्षांमध्ये खतांचा सरासरी वापर १२ हजार २९७ टन आहे. सद्यःस्थितीत मंजूर खत आणि उपलब्ध खते यांची तुलना केली असता जिल्ह्यात ९० टक्के खते उपलब्ध झाले आहे.

यापुढे भातपिकाकरिता व फळझाडांच्या खते भरणीकरिता आवश्यक असलेली आणखी खते उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून भातपिकासाठी युरिया खत मिळावे यासाठी जिल्ह्यातील ५०० टन बफर स्टॉकमधील ४१६ टन युरियाचा साठा ८३ टक्के विक्रीसाठी खुला करून देण्यात आला आहे, याचा फायदा जिल्ह्यामधील दुर्गम भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच इतरांनाही झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:13 09-07-2025