रत्नागिरी : एसटी बसची संख्या पुरेशी नसल्यामुळे प्रवासी-विद्यार्थ्यांचे हाल

रत्नागिरी : रत्नागिरी विभागाकडे एसटी बसची संख्या पुरेशी नसल्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. साखरपा येथून सकाळी सात वाजता रत्नागिरी एसटी सुरू करण्यात आली. ही एसटी काही दिवसांनंतर अनियमित येऊ लागली. याबाबत आठल्ये यांनी चौकशी केली असता लांजा आगाराकडे एसटी बस पुरेशा नसल्यामुळे हे होत असल्याचे समोर आले.

रत्नागिरी विभागांतर्गत येणाऱ्या नऊ आगारामध्ये हीच परिस्थिती असल्याचे आठल्ये यांच्या निदर्शनास आले. प्रत्येक आगारात पाच ते दहा बस कमी असल्यामुळे त्याचा परिणाम नियमित वेळापत्रक सांभाळण्यात होतो. त्यातही काही बस पासिंगसाठी आरटीओकडे पाठवाव्या लागतात. या सगळ्यामुळे कार्यरत असलेल्या चालक-वाहकांवर कामाचा मोठा ताण येतो. ही वस्तुस्थिती हर्षा आठल्ये यांनी आमदार राजन साळवी यांना निवेदन दिले आहे. या विषयात तातडीने लक्ष घालून सर्व आगारांना आवश्यक त्या संख्येच्या बस मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 16-10-2024