चिपळूण : भरधाव कार अपघातात सहाजण जखमी

चिपळूण : शहरातील मार्कंडी रोडवर भरधाव वेगाने एका कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक देत एक आलिशान कार मंगळवारी मध्यरात्री गटारात जाऊन आपटली. मात्र, कार भरधाव वेगात असल्याने गाडीच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला.

हा ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचा प्रकार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने ही गाडी मार्कंडीच्या दिशेने चालली होती. यावेळी हा अपघात घडला. या अपघातात या कारचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. या अपघातामध्ये खेर्डी येथील एका प्रसिद्ध कंपनीचे कामगार असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 10/Jul/2025