रत्नागिरी : जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक पथकाचे माजी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन पवार यांची लाच प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली.
त्यांच्या विरोधात जागृती फाउंडेशन,मालवणचे संस्थापक हेमंत धुरी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, सन एप्रिल 2017 ते एप्रिल 2018 या दरम्यान सचिन पवार यांनी त्यांच्याकडे दरमहा 5 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान 25 हजार रुपये लाच घेताना सचिन पवार यांना रंगेहात पकडण्यात आले होते.याप्रकरणी सचिन पवार यांच्यावतीने अॅड.संकेत घाग यांनी तक्रारदाराचा कोणताही प्रकल्प त्या कालावधीत सुरु नव्हता. लाचेची मागणी झाली याचे स्पष्ट व निश्चित पुरावे सरकार पक्ष देउ शकले नाही. असा युक्तिवाद करत सात साक्षिदार तपासले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने सचिन पवार यांनी या लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 10/Jul/2025














