संगमेश्वर : किरबेट येथील अर्धवट बांधकाम झालेल्या पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील किरबेट (साखरपा) येथील ब्रिजचे काम अर्धवट बांधकाम राहिल्याने परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबतची कैफियत ग्रामस्थ हर्षद पांचाळ यांनी आमदार किरण सामंत व सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवरुख यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडली आहे.

किरबेट येथील महात्मा गांधी शाळा पऱ्यावर ब्रिज बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, ते काम सध्या पावसाचे कारण सांगून तात्पुरते बंद ठेवाले आहे. मात्र सदर ब्रिज शिवाय पर्यायी मार्ग नसल्यामुळे किरबेट बौद्धवाडी, सुतारवाडी, देवडे गवळीवाडी, बौद्धवाडी वे रोहिदासवाडी अशा पाच वाड्याची रहदारी वाहतूक पूर्णता थांबलेली आहे. त्यामुळे शाळा कॉलेजमधील विद्यार्थी शेतकरी तसेच नोकरदार वर्ग यांची प्रचंड गैरसोय होत आहे. या अत्यंत गंभीर प्रश्नाकडे लक्ष देवून सदर ब्रिजचे थांबवलेले बांधकाम त्वरित सुरु करून पूर्ण करावे, किंवा आम्हाला तात्पुरती वाहतूक सुरू करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 10/Jul/2025