रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी विद्यापीठ अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथे असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीला’ भेट देऊन चालू असलेल्या संशोधन आणि विस्तार कार्याचा शनिवारी आढावा घेऊन संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचारी वर्गास मार्गदर्शन केले.
यावेळी सर्वप्रथम, ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ चे नव-नियुक्त वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, डॉ. केतन चौधरी यांनी डॉ. संजय भावे, कुलगुरू यांचे स्वागत केले. कुलगुरुंनी संशोधन केंद्राच्या झाडगाव येथील तलावांचा आढावा घेतला. तलावांमध्ये चालू असलेले मत्स्य संवर्धन आणि संवर्धना दरम्यान येणाऱ्या समस्या याबाबत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. तलावामध्ये बोयर माशांचे बीजसुद्धा सोडून त्यांचे संवर्धन करण्याचे त्यांनी सूचित केले. मत्स्य संवर्धन प्रयोगशाळा मधील चालू असलेले शोभिवंत माशांचे बिजोत्पादन, शैवाळ बीज बैंक चा प्रयोग, अक्लर्कोपोनिक प्रकल्प, पाण वनस्पती संवर्धन, यासारख्या विविध कामांची पाहणी करून आढावा घेतला. संशोधन केंद्रामध्ये ‘विद्यापीठ परिभ्रमण निधी’ अंतर्गत चालू असलेले ‘मत्स्यालय व संग्रहालय प्रदर्शन’ आणि ‘तलाबामध्ये नौकाविहार’ या प्रकल्पाबाबत कुलगुरू महोदयांनी समाधान व्यक्त केले, संशोधन केंद्राची पेठकिल्ला, रत्नागिरी येथील नवीन ईमारत चांधकाम याबाबत सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली.
तसेच संशोधन केंद्राच्या भविष्यातील शेतकरीभुमिक कार्यासाठी विविध सूचना त्यांनी केल्यात. यावेळी ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ चे डॉ. आसिफ पागरकर डॉ. हरीश धमगये, प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, व्ही. आर. सदावर्ते व अपुर्वा सावंत, सचिन पावसकर, दिनेश कुबल, तसेच प्रा. एम. टी. शारंगधर व डॉ. वैभव येवले हे सुद्धा उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन डॉ. आसिफ पागरकर यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 10/Jul/2025














