देवरुख येथील टायटन जिमच्या रोहन भालेकरची राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत कामगिरी

देवरुख : ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्टस् असोसिएशनने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय नॅचरल महाराष्ट्र श्री २०२५-२६ शरीरसौष्ठव स्पर्धेत देवरुख येथील टायटन जिमच्या रोहन विद्याधर भालेकर यांनी दोन गटांमध्ये चमकदार कामगिरी करून रत्नागिरी जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिला आहे.

या स्पर्धा अलीकडेच नौपाडा, ठाणे येथे दोन प्रकारांमध्ये संपन्न झाल्या. या दोन प्रकारांमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेत सात गटांचा, तर जीन्स मॉडेल स्पर्धेत दोन गटांचा समावेश होता. रोहन भालेकर यांनी जीन्स मॉडेल स्पर्धेतील दुसऱ्या गटात (२३ ते ३० वर्षापर्यंत) तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे, तर शरीर सौष्ठव स्पर्धेतील सातव्या गटात (खुला वर्ग उंची १७० सें. मी. वरील) मध्ये सहावा क्रमांक प्राप्त केला आहे.

रोहन भालेकर यांना टायटन जिमचे मालक व व्यवस्थापक सागर संसारे, नासिर फुलारी, प्रशिक्षक नंदकिशोर साळवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रोहन यांना भक्ती भालेकर, दीपक करंडे, हर्ष कोटकर, नितेश कांबळे, आकाश कांबळे, विधाता जाधव आणि सुजित कांबळे यांचे बहुमोल सहाय्य लाभत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 10/Jul/2025