रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य पुणे सहकारी संस्था सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडील परिपत्रकीय सूचनांनुसार केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी पी. एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजना राबविण्यासाठी राज्यातील निवडक ४५ शहरांमध्ये रत्नागिरी शहराची निवड केलेली आहे. या योजनेमध्ये सहभागी होणेसाठी व सदर योजनेबाबत माहिती देण्यासाठी १४ जुलै रोजी सायं. ६ ते ८ यावेळेत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रत्नागिरी येथील प्रधान कार्यालयात आढावा सभेचे आयोजन केलेले आहे.
या आढावा सभेस रत्नागिरी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक, रत्नागिरी महावितरण मंडळ कार्यालय अधिक्षक अभियंता, रत्नागिरी जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन मर्या. रत्नागिरी अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यकारी अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
तरी रत्नागिरीतील सर्व गृहनिर्माण संस्था अध्यक्ष/सचिव / पदाधिकारी यांनी सदर आढावा सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांनी केलेले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 10/Jul/2025














