विरसई ग्रामपंचायतीला कोकणात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल विजयोत्सव मिरवणूक

दापोली : माझी वसुंधरा अभियानांतर्गत कोकणातील विरसई गावाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या ग्रामपंचायतीला ५० लाखांचे पारितोषिक मिळाले आहे. यानिमित्त गावामध्ये विजयोत्सव मिरवणूक काढण्यात आली.

शासनाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत आदर्श ग्रामपंचायत स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत गावामध्ये विविध उपक्रम राबवले. त्यामुळे ग्रामपंचायतीने कोकणात प्रथम क्रमांक पटकावला.

यासाठी सरपंच मनोरमा राणे, ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष कृष्णा राणे, नितीन राणे यांनी ग्रामस्थांचे विशेष आभार मानले आहेत तसेच माझी वसुंधरा अभियान ५.० या अंतर्गत स्पर्धेतही अव्वल कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे. याबाबत दिनेश राणे यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी मारुती मंदिर, वरचीवाडी, राणेवाडी, फणसवाडी, कोंडवाडी व सुतारवाडी अशी मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी खेड कृषी विस्तार अधिकारी दिनेश राणे, ग्रामपंचायत अधिकारी विरेश कदम, सरपंच आणि कृषी पर्यवेक्षक यांचा सत्कार करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 16/Oct/2024