चिपळूण : महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या राज्यव्यापी संपात चिपळुणातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होत घोषणा दिल्या.
केंद्र व राज्य सरकारांच्या वीज उद्योगाच्या खासगीकरण धोरणाविरुद्ध, समांतर वीजपरवाना, प्रिपेड स्मार्ट मीटर, ३२९ सबस्टेशनचे खासगीकरण, कंत्राटीकरणामुळे महावितरण व महापारेषण कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात आणण्याच्या षड्यंत्राविरुद्ध, महावितरण व महापारेषण कंपनीच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावाच्या विरोधात, २०१९ नंतर मंजूर झालेल्या उपकेंद्रात स्टाफ मंजूर करा, सर्व कर्मचारी, अभियंत्याच्या पेन्शन योजनेकरिता, ४३ हजार कंत्राटी-बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना योग्य वेतन श्रेणीत सामावून घेण्यासाठी, ४० हजार रिक्त पदांवर भरती आदी मागण्यांसाठी हे कर्मचारी संपात सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 10/Jul/2025














