रत्नागिरी : रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षकपदावर बदली करण्यात आली आहे. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून रत्नागिरीत कार्यरत राहून त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली होती.
यापूर्वी त्यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभागात करण्यात आली होती. मात्र, सुधारित पदस्थापनेद्वारे आता त्यांची कोल्हापूर येथे थेट पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरीतील आपल्या कार्यकाळात जयश्री गायकवाड यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडल्या. बारसू प्रकल्पासारख्या संवेदनशील बाबींसह त्यांनी विविध बंदोबस्तांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कणखर नेतृत्वशैली आणि अचूक निर्णय क्षमतेमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा दर्जा उंचावला होता.
जयश्री गायकवाड यांना कोल्हापूर येथे नव्या पदावर जबाबदारी मिळाल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 10/Jul/2025












