रत्नागिरीच्या दामले विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी! एकूण १३ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले

रत्नागिरी, गुरुवार, १० जुलै २०२५: रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने यंदाच्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आपले स्थान निर्माण करत घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण नऊ विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवीच्या गुणवत्ता यादीत, तर चार विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवीच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.

इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५) – यशस्वी विद्यार्थी
दामले विद्यालयाच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे:

सान्वी दिनेश शिवगण – २६६ गुण, जिल्हा गुणवत्ता यादीत पहिली
राजवीर बिराप्पा कुरणी – २५६ गुण, जिल्हा गुणवत्ता यादीत ८ वा
केयुरी सुनील नागवेकर – २२८ गुण, जिल्हा गुणवत्ता यादीत ४९ वी
दिनेश रामचंद्र आखाडे – २२६ गुण, जिल्हा गुणवत्ता यादीत ५६ वा
अवनी मिलिंद कोकरे – २२४ गुण, जिल्हा गुणवत्ता यादीत ६५ वी
संस्कृती दिनकर गावीत – २२२ गुण, जिल्हा गुणवत्ता यादीत ७३ वी
सावनी योगेश सरपोतदार – २२० गुण, जिल्हा गुणवत्ता यादीत ८२ वी
स्वरा स्वप्नील जोशी – २२० गुण, जिल्हा गुणवत्ता यादीत ८३ वी
मृणाल अभिजीत जोशी – २१० गुण, जिल्हा गुणवत्ता यादीत १०२ वी

या विद्यार्थ्यांना सौ. श्रद्धा निरंजन गांगण, श्री. मुकेश जनार्दन पाटील, श्री. योगेश दत्ताराम कदम आणि श्री. विशाल वसंत चव्हाण या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

इयत्ता आठवी (पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५) – यशस्वी विद्यार्थी
इयत्ता आठवीमध्येही दामले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे:

तनिष्का विलास जाधव – २५८ गुण, जिल्हा गुणवत्ता यादीत १२ वी
आर्षती समीर कारेकर – २३८ गुण, जिल्हा गुणवत्ता यादीत २६ वी
आर्या कंचन पाध्ये – २३४ गुण, जिल्हा गुणवत्ता यादीत ३१ वी
नीता रामचंद्र आखाडे – २०६ गुण, जिल्हा गुणवत्ता यादीत ८६ वी

या विद्यार्थ्यांना सौ. समिधा संदीप कांबळे, सौ. मंजिरी मकरंद लिमये, श्री. रवींद्र नारायण शिंदे, सौ. सिद्धी लक्ष्मण विचारे, अक्षय गणेश जोगळेकर, तेजस्वी संग्राम सावंत देसाई आणि रोहिणी संतोष कुमार पाटील या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्रेरणास्थान आणि अभिनंदन:

शाळेचे मुख्याध्यापक श्री. भगवान शहाजी मोटे यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली हे यश संपादन झाले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, शाळेतील सर्व शिक्षक आणि आदरणीय मुख्याध्यापक यांचे या दैदिप्यमान यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! दामले विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घेतलेल्या परिश्रमाचे हे द्योतक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 10/Jul/2025