रत्नागिरी : लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा विभागांतर्गत स्वच्छता मोहीम

पावस : रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत स्वयंसेवकांकडून महाविद्यालयीन परिसराची साफसफाई करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे मूल्य, त्याचप्रमाणे श्रमदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच कोणतेही काम कमी प्रतीचे नसण्याची भावना रुजविण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. कल्पना मेस्त्री यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद वारीक यांनी या उपक्रमासाठी स्वयंसेवकांना प्रोत्साहन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 10/Jul/2025