रत्नागिरी : डाक विभागातर्फे २०१७ पासून दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली जाते. ‘दी जॉय ऑफ नये रायटिंग-डिजिटल’ युगात पत्रांचे महत्त्व संकल्पनेवर यंदा ही स्पर्धा होणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा केवळ एक स्पर्धा नाही तर पत्र वी लिहिण्याची कला आहे. देशभरातील व्यक्तींना व्यक्त होण्याची ही एक संधी आहे. त्यांचे विचार, कल्पना आणि लेखनकौशल्याला व्यासपीठ देते. वाचन, लेखन, भाषेचा वापर, टीकात्मक विचार आणि हस्तलेखन कौशल्य याची विद्यार्थ्यांच्या किंवा व्यक्तीच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. सध्याच्या डिजिटल युगाच्या वळणावरती पत्रलेखन कला मागे पडली आहे. तरीही पत्रांना आपल्या हृदयात एक विशेष स्थान आहे. याकरिता ही स्पर्धा आयोजित केल्याची माहिती डाकघर अधीक्षकांनी दिली. स्पर्धकाने एकच पत्र लिहायचे आहे. त्यासाठी मराठी, इंग्रजी, हिंदी यापैकी कोणतीही भाषा वापरू शकतात. स्पर्धेसाठी फक्त आंतर्देशीय पत्र, पोस्टाचा लखोटा, साधा लखोटा (आवश्यक तिकिटे लावून) यांचा वापर करावयाचा आहे. आंतर्देशीय पत्र किंवा ए ४ साईज कागदावरच पत्र स्वहस्ताक्षरात लिहावयाचे आहे. शब्दांची मर्यादा आंतर्देशीय पत्र ५०० शब्द आणि ए ४ साईज कागद १ हजार शब्द आहे. गट १ मध्ये वय १८ वर्षापर्यंत, गट २ वय १८ वर्षांवरील व्यक्तींचा समावेश आहे. पत्र पाठवण्याची अंतिम तारीख १४ डिसेंबर आहे. हे पत्र मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र व गोवा सर्कल ऑफिस, मुंबई या पत्त्यावर पाठवायचे आहे.
टपाल विभागातर्फे राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेच्या दोन्ही गटांतील पहिल्या तीन क्रमांकांना सर्कल स्तरावर प्रथम क्रमांक २५ हजार रु., द्वितीय १० हजार रु. आणि तृतीय ५ हजार रु. देण्यात येतील. यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिकांनी सहभागी व्हावे. – ए. टी. कुरळपकर, डाकघर अधीक्षक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 16/Oct/2024











