चिपळूण : तालुक्यातील कालुस्ते बुद्रुक येथील बौद्धवाडीतील अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आकांक्षा आदेश पवार (वय १७) असे तिचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली.
आकांक्षा हिने आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीने गळफास लावून घेतला. यामध्ये ती गतप्राण झाली. घरांमध्ये अन्य खोलीत आजी, आई व बहीण होती. हा प्रकार लक्षात येताच तिची बहीण बेशुद्ध होऊन पडली.
आकांक्षा नुकतीच दहावी परीक्षा उत्तीर्ण झाली होती. तिने अकरावीसाठी प्रवेश देखील घेतला होता. मात्र तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. या प्रकरणी पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 11/Jul/2025














