राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत अर्हा आयरेला सुवर्ण पदक

रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने तेलंगणा तायक्वांदो असोसिएशन आयोजित खुल्या तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धा 2025 बालयोगी स्टेडियम गाच्चीबोली हैदराबाद तेलंगणा येथे दिनांक 25 ते 27 जून 2025 या कालावधीत पार पडल्या.

या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीतील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये ६ वीत शिक्षण घेणारी अर्हा अमरदीप आयरे हिने क्योरुगी फाइट प्रकारात सुवर्णपदक व पूमसे प्रकारात कास्य पदक अशी दोन पदके संपादन करून रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकवले.

अर्हा ही खेडशी तायक्वांदो क्लब करवंचीवाडी येथे तायक्वांदो ऑलम्पिक खेळाचे धडे गिरवत असून प्रशिक्षक अमित जाधव सर याचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच युवा मार्शल आर्टचे मुख्य प्रशिक्षक राम कर्रा यांचे मार्गदर्शन लाभले. हे यश संपादन केल्याने प्रशालेच्या प्राचार्या यांनी अभिनंदन केले तसेच सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 11-07-2025