रत्नागिरी : पायावरून कारचे चाक गेल्याने विद्यार्थी गंभीर जखमी

रत्नागिरी : शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या मागील रस्त्यावरून चालत जाणाऱ्या विद्यार्थ्याला अज्ञात कारने धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना ९ जुलै रोजी सकाळी ११ वा. घडली. यात त्या विद्यार्थ्याच्या डाव्या पायावरुन कारची डाव्या बाजूची दोन चाके गेल्याने त्याचा पाय फ्रैक्चर झाला आहे.

अवनिश संदेश कडव (११, रा. सह्याद्री नगर नाचणे, रत्नागिरी) असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे. याबाबत त्याची आई मंजिरी संदेश कडव (३५, रा. सह्याद्री नगर नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सकाळी त्यांचा मुलगा अवनिश हा पटवर्धन हायस्कूलच्या मागील रस्त्यावरुन चालत जात होता. त्यावेळी त्याच रस्त्याने जाणाऱ्या अज्ञात कारची डाव्या बाजुची दोन चाके त्याच्या डाव्या पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 11/Jul/2025