रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ११) मुख्याध्यापक संघ, संस्थाचालक संघटना व समन्वय समितीने शाळा बंदची हाक दिली आहे. जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने संच मान्यतेसंदर्भात प्रसिद्ध केलेला १५ मार्च २०२४ चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करा, या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर एक दिवस शाळाबंद आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला रत्नागिरी जिल्हा संस्थाचालक संघटना, जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना व शिक्षकेतर संघटनांनी पाठिंबा दिला. शुक्रवारी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेपासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता होणार असल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आयुब मुल्ला यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 11-07-2025














