गुहागर : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसूल विभाग मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान तालुक्यात १४ जुलैपासून सुरु होणार आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तळवली ग्रामपंचायत, पालपेणे हॉल महसूल मंडळातील सर्व गावे १४ जुलै, गुहागर आबलोली ज्ञानरश्मी वाचनालय, गुहागर १६ जुलै महसूल मंडळातील सर्व गावे, खालची पागडेवाडी सभागृह, आबलोली १६ जुलै महसूल मंडळातील सर्व गावे, हेदवी ग्रामपंचायत हेदवी सभागृह १८ जुलै, महसूल मंडळातील सर्व गावे, पालशेत हायस्कूल २३ जुलै महसूल मंडळातील सर्व गावे, पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृह २४ जुलै महसूल मंडळातील सर्व गावांमध्ये हे अभियान होणार आहे.
शिबिरामध्ये जिवंत सातबारा टप्पा-२ च्या अनुषंगाने कामकाज, सातबारा वाटप, फेरफार अदालत, अॅग्रिस्टॅक नोंदणी, संजय गांधी निराधार, श्रावण बाळ सेवा निवृत्ती व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना लाभमंजुरी आदेश, रहिवाशी दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला, नॉनक्रिमिलिअर दाखला, शिधापत्रिका वाटप, निसप्र विषयक नोंदी (वर्ग २ च्या जमिनी वर्ग करणे), सलोखा योजना, कातकरी समाजातील लाभार्थ्यांना दाखले वाटप, आधार अपडेट, पीएम किसान योजना आदी महसूलविषयक विविध सेवा / दाखले यांचे प्रस्ताव तयार करुन लाभार्थ्यांना वितरण करण्याचे कामकाज करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 11/Jul/2025














