मेष – आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजना पासून दूर राहावे लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. दुपार नंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.
वृषभ – आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. काही ना काही कारणाने काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी उदभवतील.
मिथुन – आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र व संबंधितांना सहभागी करून घ्याल. दुपार नंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील.
कर्क – आज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.
सिंह – आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपार नंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल. व्यवसायात लाभ संभवतो.
कन्या – आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी सुद्धा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. कार्य साफल्य न झाल्याने निराश व्हाल.
तूळ – आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपार नंतर मात्र मन उदास होईल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण क्लेशकारक राहील.
वृश्चिक – कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपार नंतर भावंडांसह आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.
धनु – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साहित व ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहाने कराल. प्रवास संभवतो.
मकर – आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या बोलण्या वागण्यात संयमित राहावे लागेल. अपघाताची शक्यता असल्याने वाहन जपून चालवावे लागेल.
कुंभ – आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. नवीन परिचय होतील. परंतु दुपार नंतर प्रकृती बिघडेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. पैसा जास्त खर्च होईल.
मीन – नोकरीत वरिष्ठांकडून लाभ होतील. पदोन्नती संभवते. व्यापार विषयक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. कुटुंबात सुख समाधान नांदेल. वडीलधार्यांकडून लाभ होतील. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर सुद्धा लाभ संभवतात.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 11-07-2025














