राजापूर : सरपंचपदासाठी दोन महिन्यांपूर्वीच आरक्षण काढण्यात आले होते; मात्र न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्वीचे आरक्षण राज्यशासनाने रद्द केले आहे. आता सरपंचपदाचे नव्याने आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. या नवीन बदलाने गावपातळीवरील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलणार आहेत. सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीच्या माध्यमातून बदलाव होणाऱ्या
नव्या राजकीय समीकरणाचा कौल कोणाच्या बाजूने राहणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
दरम्यान, १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत सोमवारी (ता. १४) नगरपालिकेच्या नाट्यगृहामध्ये सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये सरपंचपदाचे आरक्षण झाले होते. त्यानुसार गावातील नेतेमंडळी निवडणुकीचे आडाखे बांधण्यात व्यस्त होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 11/Jul/2025














