सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात गडकिल्ले संवर्धनावर व्याख्यान

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास व करिअर कट्टा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गडकिल्ले संवर्धन या विषयावर प्रा. दत्ता वाघ-पाटील यांचे व्याख्यान झाले. प्रा. पाटील म्हणाले, गडकिल्ल्यांची निर्मिती आणि गडकिल्ला लढताना स्वराज्यातील निष्ठावान आणि विश्वासू सेवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

त्यांच्या बलिदानामुळेच हे गडकिल्ले आज अजरामर राहिलेत. या गडकिल्ल्यांवरूनच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची घडी बसवली. अशा गडकिल्ल्यांचे आजच्या काळात संवर्धन होणे गरजेचे आहे. या वेळी अनिरुद्ध निकम, राजेश शिंदे, प्रा. जयसिंग चवरे, प्राचार्य टी. वाय. कांबळे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 11/Jul/2025