दापोली : तालुक्यातील एका गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या फायबर मासेमारी नौकेचा लिलाव शासनाच्या आदेशानुसार होणार असून, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक तथा सर्व सोसायटी सदस्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन दापोली पोलिसांनी केले आहे.
दापोली पोलिसांनी जप्त घेतलेली नौका लाकडी तसेच फायबरने बनवलेली असून, तिची लांबी सुमारे ५५ फूट मीटर व रुंदी सुमारे २२ फूट अशी आहे. केबिन लाकडी असून, केबिनभोवती एकूण २२ निळ्या रंगाचे आवरण घातलेले खण आहे. त्या नौकेचा लिलाव करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. ती नौका दाभोळ धक्का येथे ठेवण्यात आली आहे. १४ जुलै रोजी त्या बोटीचा लिलाव केला जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 11/Jul/2025














