देवरुख: काजू फॅक्टरीमध्ये ७३ हजारांची चोरी; एकावर गुन्हा दाखल

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द येथील एका काजू फॅक्टरीतून ५० किलो वजनाची १२ काजू बियांची पोती चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये एकूण ७३,०००/- रुपये किमतीचा माल लंपास करण्यात आला असून, या प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९/०६/२०२५ ते २३/०६/२०२५ या कालावधीत फिर्यादी शैलेश शरदचंद्र जागष्टे यांच्या मालकीच्या ओझरे खुर्द, चोरप-या जवळ, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथील काजू फॅक्टरीमध्ये ही चोरी झाली. आरोपीने काजू बिया साठविण्याच्या खोलीचे वरील पडद्याचे हुक काढून, पत्रा सरकवून आत प्रवेश केला. त्यानंतर उजवीकडील दरवाजाची कडी काढून ५० किलो वजनाची १२ काजू बियांची पोती चोरून नेली.

या घटनेची तक्रार फिर्यादी शैलेश शरदचंद्र जागष्टे (वय ५५ वर्षे, व्यवसाय शेती / काजू फॅक्टरी, रा. ओझरे खुर्द, चोरप-या जवळ, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांनी १०/०७/२०२५ रोजी १९.२२ वाजता देवरुख पोलीस ठाण्यात दाखल केली.

या प्रकरणी देवरुख पोलिसांनी गुन्हा रजि. नं. ७८/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१ (३२), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात विराज डाफळे (रा. सोनवडे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) याला आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 11-07-2025