संगमेश्वर : संगमेश्वर- देवरूख मुख्य रस्त्यावर बुरंबी ते लोवलेदरम्यानच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
खास करून दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता मोठा धोका ठरत असून, काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये चक्क झाली आहे. साईडपट्ट्यांचीही अवस्था धोकादायक आहे. या रस्त्यावर काही गाडी अडकण्याची शक्यता निर्माण काळापूर्वी केबल खोदाईचे काम झाले होते; मात्र नंतर रस्ता योग्यरीत्या भरून न घेतल्याने आज ही स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात खड्डे अधिकच खोल आणि पाण्याने भरल्याने त्यांच्या खोलपणाचा अंदाजही येत नाही. स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 11/Jul/2025














