लांजात अवैध गावठी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी, लांजा, गुरुवार, १० जुलै २०२५: रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात रिंगणे कोडगाव येथे अवैध गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ५ लिटर गावठी दारूसह साहित्य जप्त करण्यात आले असून, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास रिंगणे कोडगाव, ता. लांजा, जि. रत्नागिरी येथे ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल सयोग रोहिदास वाडकर (वय ३४ वर्षे, नेमणूक लांजा पोलीस ठाणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांना माहिती मिळाली होती की, मज्जीद अब्दुल्ला मापारी (वय ६० वर्षे, रा. रिंगणे कोडगाव, ता. लांजा, जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यात गैरकायदेशीररित्या आणि बिगर परवान्याने गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून आहे. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, आरोपी मज्जीद मापारी याच्याकडे ५ लिटर मापाच्या पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि दारूचा वास येत असलेला एक स्टीलचा ग्लास मिळून आला. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ५७०/- रुपये आहे.

या घटनेनंतर लांजा पोलीस ठाण्यात १०/०७/२०२५ रोजी रात्री २०.३३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा रजि. नं. १३४/२०२५ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे मज्जीद अब्दुल्ला मापारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. लांजा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:58 11-07-2025