दापोलीत अवैध गावठी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी, दापोली, गुरुवार, १० जुलै २०२५: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आंजर्ले भंडारवाडी येथे अवैध गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ९ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास मौजे आंजर्ले, भंडारवाडी, ता. दापोली येथील एका घराच्या मागील बाजूस नारळाच्या बागेत ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल धनाजी भास्कर देवकळे (वय ३५ वर्षे, पोकॉ/१४४३, नेमणूक दापोली पोलीस ठाणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांना माहिती मिळाली होती की, श्रीमती शोभा विजय मयेकर (वय ५८ वर्षे, रा. आंजर्ले भंडारवाडा, ता. दापोली, जि. रत्नागिरी) ही आपल्या घराच्या मागील बाजूस बागेत विनापरवाना आणि गैरकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी ताब्यात बाळगून आहे. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, आरोपी शोभा मयेकर हिच्याकडे लालसर मळकट रंगाच्या १० लिटर मापाच्या प्लास्टिकच्या बरणीमध्ये ०९ लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळून आली. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत १०००/- रुपये आहे.

या घटनेनंतर दापोली पोलीस ठाण्यात १०/०७/२०२५ रोजी रात्री २१.१५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा रजि. नं. १३२/२०२५ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे श्रीमती शोभा विजय मयेकर हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 11-07-2025