रत्नागिरी, संगमेश्वर, गुरुवार, १० जुलै २०२५ : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात कोळंबे गावमळा येथे अवैध गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ८ लिटर गावठी दारूसह साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कोळंबे गावमळा येथील स्मशानभूमी जवळील भात शेतीच्या मळ्यात बांधाच्या काठावर असलेल्या झाडाच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल राहुल नामदेव खरपे (वय ३० वर्षे, पो.कॉ/१२७, नेमणूक संगमेश्वर पोलीस ठाणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांना माहिती मिळाली होती की, आशिष प्रकाश मोहिते (वय ४२ वर्षे, रा. करधंडा बौद्धवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यात गैरकायदेशीररित्या आणि बिगर परवान्याने गावठी हातभट्टीची दारू बाळगून आहे. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, आरोपी आशिष मोहिते याच्याकडे सफेद रंगाच्या १० लिटर मापाच्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये ८ लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि एक स्टीलचा ग्लास मिळून आला. जप्त केलेल्या दारू आणि साहित्याची एकूण किंमत ८४०/- रुपये आहे.
या घटनेनंतर संगमेश्वर पोलीस ठाण्यात १०/०७/२०२४ रोजी रात्री २०.१४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा रजि. नं. ९५/२०२५ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे आशिष प्रकाश मोहिते याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 11-07-2025














