लांजात पेंटिंग करताना विजेचा धक्का लागून व्यक्तीचा मृत्यू

रत्नागिरी, लांजा, गुरुवार, १० जुलै २०२५: रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे पेंटिंगचे काम करत असताना विजेचा धक्का लागून एका ५८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तुकाराम केशव मिरजोळकर (वय ५८ वर्षे, रा. मिरजोळकरवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) हे दिनांक २८/०५/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता लांजा येथील गोडे सखल रोडवर पेंटिंगचे काम करत होते. काम करत असताना त्यांना अचानक विजेचा धक्का लागला.

या घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने, त्यांना त्याच दिवशी म्हणजेच २८/०५/२०२५ रोजी रात्री ९.१५ वाजता पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना, दिनांक ०२/०७/२०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात दिनांक १०/०७/२०२५ रोजी दुपारी १.३० वाजता आमृ. क्रमांक ३५/२०२५, बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लांजा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 11-07-2025