रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे येत्या 30 जुलै रोजी शिरगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. शिरगाव येथील महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या यशोदा यशवंत पवार सभागृहात हा मेळावा ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल.
जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाइल अद्ययावत करावे. नोंदणी केलल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील युझर आयडी व पासवर्डच्या साह्याने 30 जुलै रोजीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावामध्ये ऑनलाइन अर्ज करून रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:28 11-07-2025














