पालकमंत्री उदय सामंत उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, प्रभाग ५ मधील विविध कार्यक्रमांना उपस्थिती

रत्नागिरी, गुरुवार, ११ जुलै २०२५: रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत हे उद्या, शुक्रवार, १२ जुलै २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे आणि महत्त्वाच्या उपक्रमांचे शुभारंभ केले जाणार आहेत.

या दौऱ्यातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये प्रभाग ५ मधील नूतन सभागृहाचे उद्घाटन, दहावी आणि बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि “चवीका चहा स्टॉल वाटप कार्यक्रम” यांचा समावेश आहे. प्रभाग ५ मधील हे भव्य सभागृह माजी नगरसेविका शिल्पाताई सुर्वे यांच्या संकल्पनेतून साकारले आहे. या सभागृहाच्या निर्मितीसाठी पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे.

सायंकाळी ६ वाजता पार पडणाऱ्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात प्रभाग ५ मधील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

पालकमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.