रत्नागिरी : शहरातील एका प्रसिद्ध शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीत त्याच्या कानाला गंभीर दुखापत झाली. ही घटना गुरुवार ३ जुलै रोजी घडली आहे.
या प्रकरणी प्रमोद कदम या शिक्षकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या आईने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांचा मुलगा ३ जुलै रोजी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेला होता. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास तो घरी गेला असता त्याने आपला कान दुखत असल्याचे आईला सांगितले. त्यावर आईने त्याला तुझ्या कानाला काय झाले, असे विचारले असता त्याने शाळेतील शिक्षकांनी मारहाण केल्याचे सांगितले.
त्याच्या आईने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तेथे करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासण्यांवरून त्या विद्यार्थ्याच्या कानाला गंभीर दुखापत झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 12/Jul/2025














