रत्नागिरी : रत्नागितील रत्नदुर्ग किल्ल्यावरील पाण-भुयार स्पॉटजवळ समुद्रात उडी घेत सुखप्रित धाडिवाल (२५, सध्या रा. पिंपळगाव नाशिक, मूळ रा. एलनाबाद, जि. सिरसा हरियाणा) या तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणातील संशयित प्रियकर जसमिक केहर सिंगचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मान्य केला. त्याने ५ जुलै रोजी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणी त्याच्याविरोधात बेपत्ता तरुणीचे वडील प्रकाशसिंग हरनेकसिंग धाडियाल (६९, रा. एलनाबाद, जि. सिरसा हरियाणा) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुरुवार ३ जुलै रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार, फिर्यादींची मुलगी सुखप्रित सोबत त्याचे प्रेमसंबंध होते. आपल्या मुलीच्या घातपातास तिचा प्रियकरच जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केला होता. त्यांची मुलगी सुखप्रित हिचा मित्र जसमिक केहर सिंग याने तिच्याशी मैत्री करुन तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तिच्याशी असलेले नाते तोडले होते. त्याने तिला वेळोवेळी टाळून तिचा मानसिक छळ केला होता. ती २९ जून रोजी जसमिकला भेटण्यासाठी रत्नागिरी येथे आलेली असताना त्याने तिला न भेटताच तू परत नाशिकला जा असे सांगितले. त्यामुळे तिला मानसिक त्रास देवून सुखप्रित धाडीवाल हिला रत्नागिरी येथील समुद्राच्या पाण्यात उडी मारुन जीव देण्यासाठी प्रवृत्त केले, असे त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी संशयित प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आपल्याला अटक होईल या भीतीने संशयित प्रियकर जसमिकने ५ जुलै रोजी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच संशयिताचे वकिल सचिन पारकर यांनी अस युक्तिवाद केला की, सुखप्रितने नाशिकलाच सुसाईट नोट लिहून ठेवली होती.
त्यामध्ये कोणाचेही नाव नाही. तिच्या आत्महत्येस ती स्वतः जबाबदार आहे सुखप्रितने २७ जूनपासूनच आपला मोबाईल बंद ठेवू नंतर तो रत्नागिरीत सुरु केला. त्या कालावधीत ती कुठे होती, याची माहिती जसमिकला नव्हती. तसे जसमिकने तिला कधीही कॉल केलेला नाही. तसे रत्नागिरीला बोलावलेले नाही. तसेच तिच आतापर्यंत कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही त्यामुळे तिने आत्महत्या केली किंवा नाही, याबाब कोणताही पुरावा मिळालेला नाही.
या प्रकरणी अॅड. सचिन पारकर यांनी केलेल् युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने जसमिकचा ५ हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन अर्ज मान्य केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 12/Jul/2025














