रत्नागिरी : गुरुपौर्णिमेसाठी नाणीज येथील नरेंद्र महाराज यांच्या संस्थानमध्ये आलेल्या परजिल्ह्यातील महिलेचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना १० जुलै रोजी सकाळी १०.१५ वा. घडली. अनिता गोपीनाथ मडके (५९ मुळ रा. लातूर, सध्या रा. हवेली, पूणे) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांच्या मुलाने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
त्यानुसार, त्यांची आई गुरुवारी सकाळी ७.३० वा. सुमारास सत्संग समुहाच्या महिला व पुरुषांसोबत गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने जगदगुरु नरेंद्र महाराज संस्थानमध्ये आल्या होत्या. त्याठिकाणी त्यांना उलट्या, मळमळ व जुलाब सुरु होऊन अशक्तपणा आला होता. त्यांना ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 12/Jul/2025














