रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर ते साळवीस्टॉप जाणाऱ्या रस्त्यावर आरोग्यमंदिर येथे दुकानाच्या समोर लावलेली मोटार चोरट्याने पळवली. संशयित चोरट्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (ता. ९) रात्री दहाच्या सुमारास आरोग्यमंदिर येथे घडली.
फिर्यादी बशीर मुसा काझी (वय ५८, रा. एमआयडीसी झाडगाव, रत्नागिरी) हे मोटार (क्र. एमएच-०८ एजी २१६६) घेऊन साळवीस्टॉप येथे घरगुती कामासाठी निघाले होते. औषधे घ्यायची असल्याने ते मिल्लतनगरमार्गे आरोग्यमंदिर येथे आले. तेथे लॉरेन्स अॅन्ड मेयो या दुकानासमोर, पानवलकर कॉलनी आरोग्यमंदिर येथे गाडी उभी करून घाईगडबडीमध्ये चावी गाडीला ठेवून रस्त्याच्या पलीकडील बाजूला असलेल्या दुकानात औषधे घेण्याकरिता गेले. तेथे औषधे खरेदी करून झाल्यानंतर आरोग्यमंदिर येथे गाडीजवळ आले असता त्यांना गाडी दिसून आली नाही. या प्रकरणी बशीर काझी यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 12-07-2025














