गुहागर : जानवळेत कचऱ्यात आढळली पोषण आहाराची पाकिटे

गुहागर : तालुक्यातील जानवळे फाटा शेजारी कचऱ्याच्य ढिगाऱ्यात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची पाकिटे टाकल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर आक्रमक झाले असून, शाळेचा पोषण आहार की, अंगणवाडीचा पोषण आहार याची शासनाने तत्काळ चौकशी करावी, अशी आग्रही मागणी जानवळकर यांनी केली आहे.

या संदर्भात जानवळकर यांनी सांगितले, महाराष्ट्र शासन बालकांना पोषण आहार शाळांमध्ये पुरवण्याचे काम करते; मात्र त्याची मुदत संपण्याआधीच शासनाच्या पोषण आहार आहार खिचडीची पाकिटे कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये आढळून आली, याची सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका पवित्रा घेईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 12/Jul/2025